टुरिस पद्धतीने प्रोस्टेट ग्रंथीवर “अपोलो”त उपचार
शहरातील ७७ वर्षीय रुग्णावर किचकट स्थितीतील प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया टुरिस पद्धतीने अपोलो हॉस्पिटलमध्ये नुकतीच यशस्वीरीत्या करण्यात आली.
या रुग्णाची प्रोस्टेट ग्रंथी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे त्यांना लघवीचा त्रास होत होता. त्यातच त्यांना उच्च रक्तदाब होता. त्यांची अँजिओप्लास्टी झालेली होती.
त्यांच्या हृदयाची पॉपिंगची क्षमता ३० टक्क्यांवर आली होती. त्यामुळे या शस्त्रक्रियेत मोठा धोका होता. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. प्रवीण गोवर्धने यांनी सांगितले.
चार वर्षांपूर्वी हृदयावर झालेल्या ७७ वर्षीय व्यक्तीची लघवी अचानक तुंबल्यामुळे त्यांच्या लघवीच्या जागेवर नळी टाकण्यात आली होती. लघवीचा वारंवार होणारा संसर्ग, किडनीचा संसर्ग या समस्यांनी ते ग्रस्त होते. चार वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी झाल्यावर आणखी ब्लॉकेजेस आढळल्याने पुन्हा अँजिओप्लास्टी करणे अवघड असल्याने त्यांच्या प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया करणेही गुंतागुंतीचे बनले होते.